बहुतेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी एखादा प्रसंग आला, तरच कार्य करतात, उदा. गोरक्षा करणारे गायी कत्तलखान्यात जात असल्याचे कळले, तरच कार्यरत होतात. अयोध्येत राममंदिर, गंगाप्रदूषण इत्यादींच्या संदर्भात कार्य करणारे कधीतरी कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करायचे असेल, तर असे कार्य करून चालणार नाही. चाकरी करणार्यांनी प्रतिदिन ३ – ४ घंटे तरी कार्य करायला हवे. चाकरी न करणार्यांनी प्रतिदिन ८ – १० घंटे तरी कार्य करायला हवे. कार्य नामजप करत केले, तरच त्याला साधना म्हणता येईल. त्या कार्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळेल आणि काही वर्षांतच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले