चुका झाल्यानंतर अनेक जण त्याच विचारांत रहातात आणि सेवा करतांना चुका होतील, असा विचार करून तणावाखाली सेवा करतात. चुकांचा सतत विचार करायला नको. आतापर्यंतच्या शेकडो जन्मांत आपण अनेक चुका केल्या आहेत; पण तोे भूतकाळ झाला. त्यामुळे चुकांचा विचार करण्यापेक्षा चुका न होण्यासाठी काय करायला हवे ? याचा विचार करून सतत तसे प्रयत्न करायचे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले