भावस्थिती निर्माण करण्याचे महत्त्व

आरंभीच्या स्थितीला श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी त्याच्याशी खेळणे, बोलणे इत्यादी ठीक आहे; पण पुढच्या टप्प्यात नामजप करणे अधिक योग्य ! याचे कारण श्रीकृष्णाशी बोलतांना पुष्कळ शब्दांचा वापर केला जातो, तर नामजपात केवळ चार-पाच शब्दच येतात. अनेकातून एकात जाणे, हे आपले ध्येय आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे भावाच्या स्थितीत रहाणे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment