हिंदु राष्ट्राची स्थापना काळमहिम्यानुसार होणारच असली, तरी त्या कार्यात सहभागी होणे, म्हणजे स्वतःची साधना होय !

१०.५.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी माझ्या संदर्भात सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन केले. तेव्हा त्यांनी पुढे हिंदु राष्ट्र होणार आहे, असे सांगितले. यासंदर्भात काही जणांच्या मनात प्रश्‍न आला, हिंदु राष्ट्र होणारच आहे, तर आपण प्रयत्न कशाला करायचे ?, याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे,
श्रीकृष्णाने जेव्हा केवळ उजव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला खालून काठ्या लावल्या. तेव्हा ते कृष्णाला साहाय्य करत नव्हते, तर स्वतःची साधना करत होते. त्याचप्रमाणे आपण प्रयत्न केले नाहीत, तरी हिंदु राष्ट्र होणारच आहे. आपण प्रयत्न करायचे, ते आपली साधना म्हणून, आपली उन्नती व्हावी म्हणून.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment