अयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् ।
अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्लोक ३५
अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.