ईश्वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण होऊन कल्पांत होतो.