अध्यात्मातील कृतीचे महत्त्व
सनातन संस्थेत सप्ताह, पारायणे होत नाहीत, तर साधनेत कृती करून पुढे जाण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन सत्संग आणि साधनेचा आढावा घेणे हे नित्यनियमाने होते. पारायणातून केवळ तात्त्विक माहिती मिळते; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून अहं लवकर अल्प झाल्याने देवाविषयीच्या अनुभूती लवकर येतात. केवळ पारायण न करता साधनेची प्रत्यक्ष कृती केल्यास ईश्वराविषयीची प्रायोगिक माहिती मिळाल्याने मनुष्य अध्यात्मातील आनंदावस्था लवकर प्राप्त करतोे !