‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते; परंतु आपण बहिर्मुख होऊन आवरणाशी संबंध ठेवतो आणि ‘आवरणाद्वारे कार्य चालते’, अशी आपली भावना होते. त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होत आहे. भौतिक सुखाच्या लालसेमुळे भौतिक सुखात रमणे, भौतिक सुखाची प्राप्ती करणे, यासाठीच सर्व वेळ घालवला जातो. विज्ञान आणि संशोधन हेसुद्धा याच विचारसरणीला पूरक झाले आहे. त्यामुळे आपल्यातील महान शक्ती शोधून तिचा आनंद घेण्याविषयी ऋषिमुनी आणि संत-महात्मे यांनी जे सांगितले आहे, त्यापासून आपण विन्मुख झालो आहोत आणि जन्म-मरणाच्या फेर्यात अडकत आहोत.’