चुका झाल्यावर क्षमायाचना केल्याने चुकांमुळे निर्माण झालेला मनावरचा ताण घटतो आणि मनाला समाधान लाभते. मनुष्याचे जीवन हे कर्ममय आहे. मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे त्याला मिळतेच. चुका केल्याने पाप लागते. चुका झाल्यावर केवळ क्षमायाचना केल्याने पाप नष्ट होत नाही; पण प्रायश्चित्तही घेतले, तर पापाचे परिमार्जन होण्यास साहाय्य होते.