बर्याच जणांना आध्यात्मिक ग्रंथ वाचले किंवा कीर्तने वा अध्यात्मावरील प्रवचने ऐकली की, आपल्याला अध्यात्म कळले, असे वाटते. हे खरे अध्यात्म कळणे नव्हे; कारण हे केवळ शब्दांच्या पातळीला असते. अध्यात्मातील ज्ञान जेव्हा आपण जीवनात अनुभवू लागतो, तेव्हा अध्यात्माचा अर्थ आपल्याला खर्या अर्थाने कळायला लागतो. हे खरे अध्यात्म कळणे होय. खरे अध्यात्म कळण्यासाठी साधनाच करावी लागते.