पापी लोकांनी गंगा इत्यादी सात्त्विक नद्यांत, जलाशयांत आणि समुद्रात स्नान केल्याने त्यांतील पाणी रज-तमप्रधान होणे, ते प्रदूषण स्थुलातील प्रदूषणापेक्षा अधिक हानीकारक असणे; पण भारतातील अनभिज्ञ सरकार त्यासंदर्भात काहीच करत नसणे !

‘पुंडलिक यात्रा करत असतांना त्याला काशीपासून ३ मैल अलीकडे कुक्कुट ऋषींचा आश्रम दिसला. तेथे त्याने मुक्काम केला. तेथे त्याला रात्रीच्या वेळी वर्णाने काळ्याकुट्ट असलेल्या आणि मलीन वस्त्रे परिधान केलेल्या ३ स्त्रिया ऋषींच्या आश्रमात येतांना दिसल्या. त्यांनी रात्रभर ऋषींची सेवा केली आणि सकाळी सडासंमार्जन करून त्या परत जाऊ लागल्या. हे पाहून पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून विचारले, ‘‘मातांनो, तुम्ही कोण आहात ? रात्रीचे तुमचे ते भेसूर रूप आणि आताचे तुमचे हे दैदीप्यमान रूप असा तुमच्यात पालट कसा झाला, हे कृपा करून मला सांगा.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही तिघी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या आहोत. पापी लोक प्रतिदिन आमच्या जलात स्नान करतात आणि शुद्ध होतात; परंतु त्यांचे ते पाप आम्हाला लागते. त्यामुळे आम्ही काळ्याकुट्ट म्हणजे मलीन होतो. ऋषींची सेवा केल्याने आम्ही पुन्हा पवित्र होतो.’’

Leave a Comment