‘आपल्यात अंतर्मुखता येण्यासाठी सेवा करण्यापूर्वी शरिरातील इंद्रियांना प्रार्थना करून त्यांची अनुमती घेऊन सेवा करावी आणि सेवा झाल्यानंतर प्रत्येक इंद्रियाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. इंद्रियांना गुलामाप्रमाणे वापरायला नको. सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचाच अर्थ प्रथम आपण स्वतः ‘आर्य’ व्हायचे (व्यष्टी साधना करायची) आणि सर्व समाजाला आर्य करण्यासाठी (समष्टी साधनेसाठी) प्रयत्न करायचा.’