‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून कृती करावी. अशा प्रकारे आत्म्याशी सतत मनाद्वारे अनुसंधानित राहिल्यास मन शांत होऊन प्रत्येक कार्य देवाला अपेक्षित असे होईल !’