‘आपण दिवसभर भाव ठेवून कृती केल्यास आपल्यातील चैतन्यावर असलेले आवरण लवकर दूर होते. आपल्या शरिराभोवती चैतन्याचे आवरण निर्माण झाल्यामुळे बाह्य संकटांचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही. चैतन्याद्वारे आपण कोणत्याही संकटाला निर्भयतेने आणि सहजतेने सामोरे जाऊ शकतो. अशा रीतीने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय आहे. याद्वारेच आपण जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटतो.’