‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल.’