आश्रमातील सर्व साधक संन्यासी आहेत.
संन्यासी = सं + न्यासी. न्यास = नि + अस् = स्थापन करणे. ज्याचे जे स्थान आहे, त्या ठिकाणी त्याला स्थापन करणे.
समेवर (समत्वाने) स्थिर रहाणारा
समत्व स्थितीवर असलेला
एखादा रोग झाल्याचे समजल्यावर ‘देव मृत्यूचे कारण सांगून घेऊन जात आहे’, या विषयी कृतज्ञता वाटायला हवी :
आपल्याला एखादा रोग झाल्याचे समजल्यावर काळजी आणि भीती मनाला ग्रासून टाकते; पण ‘देव आपल्याला मृत्यूचे कारण सांगून घेऊन जात आहे’, या विषयी कृतज्ञता वाटली पाहिजे, तरच आपल्याला काळजी आणि भीती वाटणार नाही. ‘आपण गेलेलोेच आहोत, असे समजून राहिलो’, तर निर्भयपणे रहाता येईल.
मनाची स्थिती रोगाला पूरक-पोषक होते, त्या वेळी मन भगवंताकडे वरील प्रकारे लावून निर्णय घेता येतो.
केवळ भगवंताशी संबंध ठेवायला हवा !
आपल्या नावासह प्रारब्धाने आलेले सर्व संबंध तोडून टाकायचे. केवळ भगवंताशी संबंध ठेवायचा. ‘सगळीकडे प्रलय झाला आहे. केवळ भगवंत आणि मी असे दोघेच आहोत’, अशी मनाची सिद्धता करायची.’