आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली, त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.
सगुणाची पूजा करतांना आपल्यातील भगवंत प्रसन्न व्हायला हवा !
सगुणाची पूजा, म्हणजे ‘आपल्यातील निर्गुण ईश्वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत’, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.
ईश्वर त्याच्या संकल्पाने काहीही करू शकतो. तो एकाच वेळी अनेक गोष्टी करत असतो.
श्रद्धावान लभते ज्ञानम् !
श्रद्धा असेल, तर ज्ञान मिळते, तसेच केवळ श्रद्धा असेल, तर आधार वाटतो.
‘कार्य होत आहे’, असे दिसत असतांना ‘ते भगवंतच करत आहे’, याची जाणीव नसणे :
दिसतांना कार्य दिसते; परंतु ‘ते कोण करत आहे ?’, हे लक्षात येत नाही. कार्य नष्ट होते; परंतु भगवंत टिकून रहातो, म्हणून तो सत्य आहे.