‘भगवंताने आनंद घेण्यासाठी मानवाचे शरीर यंत्र निर्माण केले. त्याला सर्व दृष्टींनी साहाय्यभूत होणारी ही सृष्टी आणि हा निसर्ग निर्माण केला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या शक्तींद्वारे भाषण, संगीत, नृत्य आदी माध्यमांद्वारे निर्माण होणारा संबंध, ही नियोजकता समजून घेणे आवश्यक आहे.
याचा सर्व दृष्टींनी जीवनात लाभ करून घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे साधना करून लाभ करून घेणे, याला भाग्यच हवे. ते आज आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे या भावसत्संगाद्वारेे लाभले आहे.
‘हे गुरुमाऊली, या आपत्काळात भावजागृती सत्संगाच्या माध्यमातून आम्हाला येणारी अनेक संकटे आणि सूक्ष्मातील दुष्ट शक्ती यांपासून होणारे त्रास यांना तोंड देण्यासाठी आत्मबळ मिळत आहे. यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
‘हे भगवंता, तुझ्याच कृपेने, या भावसत्संगातून तुझीच चैतन्यमय वाणी प्रगट होत आहे. ती आमच्या अंतर्मनावर कोरली जाऊ दे. ती आम्हाला जाणवू दे ! ब्रह्मांडातून येणारे चैतन्याचे स्रोत आम्हाला मिळून आनंद मिळू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे !’