परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या साधकांसाठी होणा-या भावजागृती सत्संगाविषयीचा परात्पर गुरु पांडे महाराज यांचा भाव

मनुष्य प्रतिदिन व्यवहारातील रज-तमाच्या प्रभावामुळे त्रस्त रहातो. त्यामुळे तो आनंद आणि शांती यांच्या शोधात असतो. त्या वेळी उपलब्ध असलेल्या उपायांचा लाभ मिळण्यासाठी तो उपाहारगृहातील पदार्थ ग्रहण करतो, दूरचित्रवाहिनी पहातो, मनोरंजन करून घेतो; परंतु हे उपाय क्षणिक रहातात.

अशा प्रसंगी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हा भावजागृतीचा सत्संग मिळत आहे. त्यामुळे आपल्याला प्राप्त होणारा अंतर्गत भावानंद अवर्णनीय आहे.

भावजागृती सत्संग विनामूल्य, आनंददायी आणि कायमस्वरूपी मार्गदर्शक आहे. तो येणार्‍या पुढील भावजागृती सत्संगापर्यंत टिकून त्यापुढे येणार्‍या भावसत्संगाला पूरक रहाणारा आणि कायमस्वरूपी आनंद देणारा होतो.

त्याद्वारे मिळणारे प्रेम हे दिव्य, मौलिक, कल्याणकारी, आत्मजागृती करणारे, जीवनाला सत्प्रवृत्त करणारे असल्यामुळे आम्हा साधकांचे जीवन पालटून आनंदमयी होते.

एवढेच नव्हे, तर त्याद्वारे आम्ही आमच्यापुढे उद्भवणार्‍या कोणत्याही कठीण प्रसंगाला सहज सामोरे जाऊ शकतो.

या भावसत्संगातून आपल्याला होणारा आध्यात्मिक त्रासही उणावणार आहे.

आम्हाला मिळत असलेली ही केवढी मोठी उपलब्धता आहे, हे आम्ही विसरू शकत नाही.’

Leave a Comment