दुसर्याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्याच्या कानाद्वारे ऐकले जाऊन त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होण्यामुळे भावजागृती होणे
दुसर्याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्याच्या कानात जातात आणि त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होतात. यात भगवंताची केवढी किमया आहे आणि तेही इतक्या लवकर होते की, ते लक्षातही येत नाही. अशा रीतीने त्याची कृपा लक्षात घेतल्यास आपली भावजागृती होते. यासाठी ‘भगवंताची आपल्यावर प्रत्येक माध्यमातून किती कृपा आहे’, हे लक्षात घेऊन प्रत्येक कर्म केल्यास आपण भगवंताच्या कृपेसंबंधी नेहमी कृतज्ञतेत रहातो. या लहरी चैतन्याने भारीत असतील, तर खरा आनंदही प्राप्त होतो.
कंठयंत्र आणि कर्णयंत्र यांमध्ये भेद असूनही कंठाद्वारे प्रतिपादित झालेला शब्द कर्णयंत्राद्वारे प्रतिध्वनीत होऊन कसा काय ऐकला जातो, याचे आश्चर्यच आहे ! तसेच ऐकलेल्या शब्दांचा अंतरस्थ असणारे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांवर परिणाम होतांना दिसतो. ही भगवंताची अगाध लीला आहे. हे त्याचे नियोजन समजून घेतल्यास भावजागृती होते.