‘प्रत्येकाचे जीवन क्षणाक्षणाने बनलेले असून प्रत्येकाच्या हातात केवळ वर्तमान क्षणच आहे. तो क्षण सुटला की, पुन्हा परत मिळत नाही, तसेच पुढचा क्षण आपल्या हातात आहे कि नाही, याची शाश्वतीही नाही. आपण आपला वेळ अशाश्वत गोष्टींमध्ये वाया घालवण्याऐवजी शाश्वत गोष्टींसाठी (साधना करून चैतन्य वाढवण्यासाठी) दिल्यास आपण पूर्णतः समाधानी होऊ शकतो. अन्यथा माणूस आळशी होऊन तो पूर्ण जीवनभर अशाश्वत गोष्टींमध्ये रममाण होईल आणि निरर्थक जीवन घालवल्यामुळे जन्म-मृत्यूच्या पाशात अडकेल.