साधकांनो, आनंद आपल्यातच आहे, हे जाणा !

‘आनंद’ हा प्रत्येक जिवाचा स्थायी भाव आहे. खरेतर जीव या आनंदालाच शोधत असतो; परंतु भ्रमामुळे त्याला आपल्यातच ‘आनंद’ आहे, हे ठाऊक नसते. त्यामुळे त्याची स्थिती कस्तुरी मृगाप्रमाणे होऊन तो विविध मार्गांनी आनंद प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत रहातो. त्याच्यातील स्वभावदोषांमुळे तो दुष्कृत्यांकडे वळतो. साधनेमुळे गुुरुप्राप्ती झाल्यावर ‘खरा आनंद कशात आहे’, हे कळायला लागते आणि जीव महानंदात राहू लागतो. त्याला कळते, ‘भगवंतातच आनंद आहे. भगवंतच आनंदमय आहे; म्हणून ईश्‍वरप्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे.’ जीवनाचे हे ध्येय त्याला केवळ गुरुकृपेनेच साध्य होऊ शकते.’

Leave a Comment