अशक्य ते शक्य होते; मात्र ते त्या प्रमाणात पाहिजे. ज्या प्रमाणात कर्म असेल, त्याच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला पाहिजे. ‘एकदा नाम घेतले की, काम होऊन जाईल’, असे नसते. नाम कर्माच्या सहस्रो पटींत पाहिजे. नामाचा पुष्कळ साठा पाहिजे. तुमची अधिकोशात जितकी जमा अधिक, तितका तुम्हाला तिचा आधार वाटतो. असे असूनही अधिकोशात जमा असलेले पैसे ऐन वेळी उपयोगाला येतीलच, याची शाश्वती नसते. ही भगवंताची लीला आहे. आपल्याकडे कितीही पैसा वा संपत्ती असली, तरी पोटासाठी फार काही लागत नाही. त्यामुळे खर्या अर्थाने त्या संपत्तीचा उपयोगही नाही. शेवटी आपल्या हृदयात असलेला भगवंतच आपला आहे. त्याची आराधना करणे, हेच खरे धन आहे. ते केव्हाही आपल्या जवळच असते. तेच कोणत्याही कठीण प्रसंगात आपल्याला साहाय्यास येते, हे लक्षात घ्यावे.’