‘धर्मांधांविषयी काही ‘खुट्ट’ घडले, तर सर्वत्र हाहाःकार माजतो. हा निधर्मीपणा का ? गोध्रामध्ये ज्या हिंदूंना जाळले, त्यांच्याविषयी कुणी वाच्यताही करत नाही. म्हणजे जे खरे आहे, त्याला दाबून टाकले जाते आणि जे खोटे आहे, त्याला उत्थान (प्रोत्साहन) दिले जाते. त्यांनी केलेल्या दुष्कर्मांची कुठे वाच्यताही नाही आणि हिंदूंनी काही केले नसतांना त्यांना वेठीस धरले जाते, ही आजची परिस्थिती आहे. काश्मिरी हिंदूंवर जी परिस्थिती ओढवली आहे, ती मुसलमानांवर ओढवली असती, तर काय झाले असते ? विषय जगभर झाला असता. त्या हिंदूंसाठी ना हिंदू ना जागतिक स्तरावर कुणी आवाज उठवतो ! म्हणजे जे सत्य आहे, त्याला सध्या किंमत नाही आणि जे असत्य आहे, त्याचा उदोउदो चालू आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांमध्ये लाखो हिंदू मेले, दीड सहस्र सैनिक जखमी झाले; पण त्याच्याविषयी काही वाच्यता नाही. ना सरकार याला महत्त्व देते, नाप्रसिद्धीमाध्यमे ! ‘मुसलमानांना काही झाले, तर म्हणे ‘मला गोळ्या घाला’, ही नेत्यांची भाषा ! याच्याविषयी काय म्हणावे ?
यावरून ही परिस्थिती निर्माण होण्याचे कारण कलियुगाचा वाढलेला प्रभाव. दुष्टांना दिलेल्या प्रोत्साहनाचा हा दुष्परिणाम आहे. यासाठीच जनतेने त्या नेत्यांना निवडून दिले का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !!
हिंदूंनो, पुढच्या वेळी हिंदु लोकहितार्थ कार्यरत असणार्यांनाच निवडून द्या !’