१. आपण आपल्या इच्छाशक्तीद्वारे कार्य करत असतो. ती शक्ती अतिशय अल्प असल्याने कार्यासाठी आपल्याला समर्थ करत नाही. यासाठी भगवंताच्या अनुसंधानात राहून नामस्मरण केल्यास भगवंताच्या शक्तीद्वारे ते कार्य सहज सुलभ फलद्रूप होऊन आनंददायी होते.
२. नामस्मरणाद्वारेच जिवातील शक्ती ईश्वरी शक्तीने भारीत होते. अशी ईश्वरी शक्तीच आपले कार्य यशस्वी करते.
३. नामस्मरणामुळे भगवंताशी कायम अनुसंधानात रहात असल्यामुळे त्याच्यापासून चैतन्य मिळते. त्याची कृपा होते आणि त्यामुळे आपण कायमस्वरूपी आनंदात राहू शकतो.’