‘आपण थोड्या कालावधीपुरता विचार करतो; परंतु आपल्याशी संबंधित घटना संपूर्ण ब्रह्मांडात कुठे ना कुठे कार्यरत असतात. असे असतांना परात्पर गुरु डॉक्टर त्यातून ओढून साधकांची प्रगती करून घेत आहेत. ही त्यांची कृपा आहे. परात्पर गुरु डॉक्टर या भूमंडलाचेच शुद्धीकरण करत आहेत. आपण संकुचित विचारांत रहातो; पण परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ व्यापक विचार करतात. भूमंडलाचीच शुद्धी झाली की, त्याचा परिणाम मनावर होतो. मन शुद्ध होते. या शुद्धीमुळे चैतन्य कार्यरत होत असून सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींना त्याचा त्रास होत आहे. त्या उफाळून येत आहेत. जसे रात्रीच्या वेळी बारीक कीटक प्रकाशाकडे आकर्षिले जातात आणि प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मरतात, त्याप्रमाणे हे आहे.’