‘भगवंताने माणसाला विपुल धन दिले आहे, तशीच त्याने त्याला बुद्धीही दिली आहे. मनुष्याने भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी बुद्धीचा सदुपयोग करायला हवा; पण मानव बुद्धीचा दुरुपयोग करून स्वतःची हानी करून घेत आहे. हिरे-माणके गाढवासमोर ठेवले, तर तो काय करील ? त्याला त्याचे काय मूल्य असणार ? त्याला आपली उपजिविका करणे, एवढेच ज्ञान आहे. तसेच हे आहे.
भगवंताने प्राण्यांना अतिरिक्त ज्ञान दिले नाही. भगवंताने त्यांना स्वतंत्र ठेवले आहे. माणसाला मात्र त्याने ‘जाणीव’ (योग्य-अयोग्य जाणण्याची बुद्धी, सजगता) दिली आहे; परंतु तो त्याप्रमाणे वागत नाही आणि प्राण्यांना ही जाणीव दिली नाही, त्यामुळे तेही तसे वागत नाहीत. दोघेही सारखेच झाले.’
(‘प्राण्यांना मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते; परंतु मानवाला मनासमवेतच बुद्धीही दिल्याने त्याच्या मनाप्रमाणे वागण्यावर बुद्धीचा (तारतम्याने योग्यायोग्य समजून वागण्याचा) अंकुश असतो. तो जर नसेल, तर प्राणी आणि मनुष्यप्राणी दोघेही सारखेच नाहीत का ?’ – संकलक)