‘मनुष्याने विचार करू नये’, असे नसते; मात्र कोणत्या विचारांपासून काय लाभ होतो, हे पहायला पाहिजे. ‘कोणत्या विचारांनी उन्नती होते आणि कोणत्या विचारांनी अवनती होते ?’, हे पहायला हवे. विचार हा मार्गदर्शक आहे. तो वाटाड्या आहे. त्याला ज्ञानाने समर्थ करणे आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे अनुभूतीजन्य विचार. ते घेऊन पुढे चालणे आवश्यक आहे. रानटी लोकांना कोण मार्गदर्शक आहे ? त्यांच्यात जी पद्धत रूढ झाली, त्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने ते जात आहेत. त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. आपल्याकडे भौतिक प्रगती असूनही मानवाची अवनत अवस्था झाली आहे. त्यामुळे योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शक हवाच !’