‘छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या १२ व्या वर्षी विजापूरला शहाजीराजांकडे गेले असतांना रस्त्यात गायीची हत्या होत असलेली पाहून त्यांनी त्वरित गायीवर घाव घालत असलेल्या कसायाचा हात वरच्या वर छाटून टाकला. यामुळेच शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक राजा’ असे संबोधतात. ‘आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे’, असे आज राज्यकर्ते सांगतात; मग संपूर्ण देशभरात ‘गोहत्याबंदी कायदा’ आणण्यासाठी ते का झटत नाहीत ? गोरक्षक नसलेल्या राज्यकर्त्यांना स्वतःला गो-पालक म्हणवून घेण्याचाही अधिकार नाही !’