चैतन्याचा प्रसार करा !

सध्या आधुनिक कृत्रिम अशुद्ध धाग्यांनी बनलेले असात्त्विक कपडे वापरल्याने रज-तमाचा प्रसार होत आहे. एवढेच नव्हे, तर कपड्यांवरील नक्षीकामही अनिष्ट शक्तींनी भारलेले असते. साहजिकच त्यांतून रज-तमाचा प्रभाव वाढतो. यासाठी सात्त्विक वेशभूषा केली पाहिजे.

सध्या आवडी-निवडीचा प्रसार केला जातो. माल विकला जावा, यासाठी दुकानदार त्याचे विज्ञापन करतो आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःचे पैसे व्यय करून अयोग्य गोष्टी स्वीकारतो, म्हणजे येथे भगवंताने दिलेल्या बुद्धीचा आपल्याकडून दुरुपयोग होतो. साधनेद्वारे बुद्धीची क्षमता वाढवून विवेकात्मक बुद्धी निर्माण केल्यास अशा प्रलोभनांना आपण बळी पडणार नाही.

अन्नापासून मन बनते. बाह्य आणि अंतर परिस्थितीचा मनावर परिणाम होतो. जसे मन, तसे कार्य होते. सात्त्विक अन्नाच्या सेवनामुळे स्वतःत चैतन्य निर्माण होते. यासाठी अन्न सात्त्विक असावे. सात्त्विकता वाढल्याने मन प्रसन्न होते.

अशा गोष्टींचा प्रसार करणे, ही सेवा आणि साधना आहे.

Leave a Comment