सध्याचे मराठी साहित्य संमेलन हे अगदी खालच्या स्तरावर चालू आहे. त्यामुळे साहित्याची अधोगती होत आहे. हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. साहित्य हे समाज आणि परिस्थिती यांचे दर्शन घडवते. ॐकाराला ब्रह्म म्हटले आहे. ॐकाराद्वारे शब्दांची निर्मिती झाली आहे. या शब्दसामर्थ्यामुळे मानवाला ज्ञान प्राप्त होत आहे. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य साधनेमुळे निर्माण होते; म्हणूनच ऋषिमुनींनी निर्माण केलेल्या साहित्यातील चैतन्य आजही टिकून आहे. आजच्या साहित्यात ती चैतन्यशक्ती न राहिल्याने त्याचे सामर्थ्य क्षणिक झाले आहे.