१. दारू, सिगारेट, विडी, तंबाखू इत्यादी व्यसन लावणार्या पदार्थांचे उत्पादनच होणार नाही, असे न करता त्यांचे अनिष्ट परिणाम सरकार सांगते.
२. नद्यांचे पाणी प्रदूषित होणार नाही, असे न करता जलशुद्धीकरणाचा देखावा सरकार करते.
३. मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड करणार्यांवर शासन कोणतीही कारवाई करत नाही आणि झाडे लावा, झाडे जगवा सारख्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या उपक्रमांतून पर्यावरण रक्षणाचा देखावा करते.
४. समाज नीतीमत्ताशून्य करणारी पुस्तके, नियतकालिके, सिनेमे, दूरचित्रवाहिन्यांचे कार्यक्रम, संकेतस्थळे इत्यादींवर बंदी न घालता नैतिकमूल्यांचे शिक्षण देण्याचा देखावा सरकार करते.
५. भ्रष्टाचाराला कारणीभूत असणारे राजकारणी आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्यावर कारवाई न करता कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना रंगेहात पकडून शासन भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाटक करते.
६. जातीय आणि धार्मिक निकषांवर आरक्षण देऊन आणि विविध योजना चालू करून समाजात दुही निर्माण करणारे शासन दुसरीकडे सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा देखावा करते.
७. आतंकवाद्यांविषयी शून्य संवेदनशीलता दाखवण्याऐवजी आतंकवाद्यांना मानधन आणि शासकीय नोकर्या देऊन पोसणारे शासन आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या घोषणा देते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले