साधकांनो, चारही वर्णांनुसार साधना करता येत नाही; म्हणून दुःख करू नका !

धर्मरक्षणाचे वर्णानुसार (जातीनुसार नव्हे !) पुढील चार प्रकार आहेत.

वर्ण साधना श्रीकृष्णाने सर्वांसमोर ठेवलेल्या
चारही वर्णांनुसारच्या साधनेची उदाहरणे
१. ब्राह्मण अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन गुरुगृही शिक्षण घेणे
२. क्षत्रिय धर्मरक्षण अनेक दुर्जनांचा नाश करणे
३. वैश्य धर्मासाठी धनाचे अर्पण सुदाम्याचे दारिद्य्र दूर करणे
४. शूद्र धर्मसेवेसाठी शरीर अर्पण पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी उचलणे

काही साधकांना वाटते, आपण चारही वर्णांनुसार साधना करून जलद प्रगती करावी. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, केवळ भगवंतच चारही वर्णांनुसारच्या साधनेची उदाहरणे आपल्यासमोर ठेवू शकतो. आपल्याकडे बुद्धी, धन, शारीरिक क्षमता यांपैकी जे असेल, ते अर्पण करणे साधनेत अपेक्षित असते. त्यामुळे आपल्याला ज्या १ – २ वर्णाच्या सेवा करणे शक्य होईल, त्याच आपण कराव्यात. त्यानेही जलद उन्नती होईल.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment