हिंदूंनो, जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विसरून हिंदू म्हणून एक व्हा !

१. हिंदूंच्या सर्वसमावेशक ऐक्याची आवश्यकता : भारतात आज हिंदू बहुसंख्य आहेत; पण हिंदूंचे हे सामर्थ्य जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विविध घटकांमध्ये विभागले गेले आहे. हिंदूंच्या संघशक्तीच्या र्‍हासामुळेच अन्य धर्मीय अल्पसंख्यांक असूनही हिंदु धर्म आणि समाज यांवर विविध प्रकारे (उदा. लव्ह जिहाद, धार्मिक दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, धर्मांतर आदी) अत्याचार करतात, तसेच शासनाकडूनही हिंदूंना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे हिंदूंनी जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विसरून हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे.

२. हिंदूंच्या संघशक्तीचे लाभ


अ. दंडशक्ती : आंदोलन, रस्ता बंद, मोर्चे असे काहीतरी केल्यावरच, म्हणजे दंडशक्ती दाखवल्यावरच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यकर्ते प्रयत्न करतात. ज्याला जी भाषा समजते, त्याला त्याच भाषेत समजावले पाहिजे. हिंदू संघटनांचे एकत्रीकरण झाल्यास ही दंडशक्ती निर्माण होईल. त्यामुळे हिंदूंच्या ऐक्याची दखल राज्यकर्त्यांना घ्यावी लागेल. तसेच जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विसरून हिंदू एक झाले, तर अन्य धर्मियांनाही त्याचा शह बसेल.

आ. हिंदु मतपेढी : मुसलमानांकडे एकगठ्ठा मतपेढी असल्यामुळे सर्वपक्षीय राज्यकर्ते त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हज यात्रेला अनुदान, सच्चर आयोगाची अंमलबजावणी, मदरशांना विशेष अनुदान हे सर्व मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांचे फलित आहे. हिंदू जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा अशा वेगवेगळ्या गटांत विखुरल्यामुळे त्यांची मतेही विभागली गेली आहेत. हिंदूंचे एकत्रीकरण झाल्यास हिंदूंची मतपेढी सिद्ध होईल आणि हिंदूंची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी का होईना; पण हिंदूहिताचा विचार राजकीय पक्षांना करावा लागेल.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment