१. जातीवरून आरक्षण मागणारे : हे केवळ स्वतःचाच विचार करणारे, स्वार्थी असतात. ते केवळ स्वतःच्या जातीचा विचार करतात. समाजातील इतर जाती आणि राष्ट्र अन् धर्म यांचे त्यांना सोयर-सुतक नसते. त्यामुळे साहजिकच ते ईश्वरापासून दूर असतात.
२. आत्मकल्याणासाठी (ईश्वरप्राप्तीसाठी) सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणारा हिंदु धर्म : दुर्योधन हा कौरवकुळाच्या विनाशाला कारण ठरणार आहे, हे ऋषीमुनींना ठाऊक होते. त्यामुळे त्याच्या जन्मापूर्वीच त्याचा त्याग करावा, असे धृतराष्ट्राला सांगतांना ऋषीमुनी म्हणतात,
त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥ – महाभारत, पर्व १, अध्याय १०७, श्लोक ३२
अर्थ : संपूर्ण कुळाच्या कल्याणासाठी एका पुत्राचा त्याग करावा लागला, तर तो करावा. एका गावाला वाचवण्यासाठी त्यातील एक कुळ सोडण्याची वेळ आली, तर ते खुशाल सोडावे. राष्ट्रासाठी आवश्यकतेनुसार गावही त्यागावा आणि आत्मकल्याणासाठी पृथ्वीचाही (स्वतःच्या प्राणांचाही) त्याग करावा लागला, तर तो अवश्य करावा.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले