प्रत्येकाच्या मुळाचा शोध घेतला असता भगवंताचे अस्तित्व लक्षात येते, उदा. हात-तोंड पुसण्यासाठी वापरण्यात येणार्या रुमालाचे मूळ कापूस आहे, कापसाचे मूळ झाड आहे, झाडाचे मूळ बी आहे आणि या बीचे मूळ भगवंत आहे.
रुमालातील भगवंत आपल्यातील भगवंताचे तोंड पुसतो, म्हणजे त्याची सेवा करतो. लेखणीतील भगवंत लिखाणाची सेवा करतो, अशा प्रकारे विचारप्रक्रिया ठेवल्यास आपले अस्तित्वच नष्ट होते. सातत्याने या विचाराने कृती केल्यास अहंचा वध (नाश) होतो. त्यामुळे सजीव-निर्जीव काही असो, त्याच्या मुळाशी जाऊन त्यातील भगवंताचा शोध घ्यावा. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)