जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात येते. यालाच ज्ञान / आत्मज्ञान म्हणतात. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.८.२०१४)