प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन / वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या.
१. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी.
२. प्रार्थना करावी.
३. कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
४. कृतीच्या परिणामांचा विचार करावा.
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)