काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !

‘आईच्या पोटात असतांना आपली काळजी कोण घेत होते ?’ सहा मासांचे (महिन्यांचे) असतांना दूध मिळेल का ? याची काळजी होती का ? मग आता का आहे ? आतापर्यंतचे आयुष्य एका क्षणात गेले. मग पुढील १० वर्षांची काळजी कशाला ? कोणत्याही प्रकारची काळजी करणे म्हणजे श्रीकृष्णावरील अश्रद्धा होय. काळजी आणि चिंता आपल्याला मागे खेचते. आजपर्यंत इतके दुःख आणि आपत्ती यांमध्ये भगवंताने निभावून आपल्याला जिवंत ठेवले. त्यामुळे भविष्यकाळाची काळजी करणे मूर्खपणाचे नव्हे काय ?’
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१४)

Leave a Comment