युगांनुसार व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रमाण आणि कलियुगात समष्टी साधनेचे महत्त्व

साधनेचा प्रकार सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग
१. व्यष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) १०० ७० ५० ३०
२. समष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) ३० ५० ७०
एकूण १०० १०० १०० १००

सत्ययुगात प्रत्येक जण साधना करणारा असल्यामुळे समष्टी साधनेची, म्हणजे समाजात जाऊन साधनेचे महत्त्व सांगणे, साधना करवून घेणे इत्यादींची आवश्यकता नव्हती. पुढे त्रेतायुग आणि द्वापरयुग यांत व्यष्टी साधनेचे प्रमाण अधिकाधिक अल्प होत गेले. कलियुगात तर व्यष्टी साधनेचे प्रमाण ४ – ५ टक्के इतके कमी झाल्यामुळे इतरांना साधना सांगण्याचे, म्हणजे समष्टी साधना करण्याचे प्रमाण अधिक असणे आवश्यक झाले आहे.

वरील तक्त्यावरून कलियुगात समष्टी साधना किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येईल. यासाठीच सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेत समष्टी साधनेला प्राधान्य दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी आणि समष्टी साधनेचे एकमेव आदर्श उदाहरण म्हणजे हनुमान ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment