स्वेच्छा, परेच्छा किंवा ईश्‍वरेच्छा याप्रमाणे वागणे

हे शब्द साधनेच्या संदर्भात आहेत, हे लक्षात न घेता एका साधकाने बायकोच्या साधनेला असलेल्या विरोधाला परेच्छा समजून साधना करणे बंद केले. एका जिज्ञासूने विचारले, मित्राने दारू पिण्याचा आग्रह केल्यास परेच्छा म्हणून दारू प्यायची का ? येथे लक्षात घेतले पाहिजे की, अशा वेळी परेच्छेऐवजी ईश्‍वरेच्छा काय असेल ?, याचा विचार करावा. ईश्‍वर कधी साधना करू नको किंवा दारू पी, असे म्हणेल का ? थोडक्यात म्हणजे आपल्या मनाचा विरोध असला, तरी साधनेला पूरक असलेल्या परेच्छेचा स्वीकार करावा आणि पूरक नसलेल्या परेच्छेचा स्वीकार करू नये ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment