बर्याच जणांना आश्चर्य वाटते की, फक्त सनातनचे अनेक साधक जलद गतीने प्रगती कशी करतात ? त्यांच्यापैकी अनेकजण संत कसे होतात ? यांचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
१. इतरत्र शिकवतात, तशी वर्षानुवर्षे केवळ तात्त्विक माहिती सनातनमध्ये सांगण्यात येत नाही, तर प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृती शिकवण्यात येतात.
२. सर्वांना एकच साधना न सांगता व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग हे तत्त्व वापरण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाला साधना करणे सुलभ होते.
३. व्यष्टी साधनेच्या बरोबरीने समष्टी साधनाही शिकवण्यात येते.
४. प्रत्येक साधकाच्या साधनेचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेतला जातो. त्यामुळे प्रत्येकाला साधनेचे पुढच्या पुढच्या स्तरांचे मार्गदर्शन मिळते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले