सांप्रदायिकांनो, आपल्या संप्रदायाचा अहंकार सोडा, तरच प्रगती होईल !

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनो, इतर संघटनाही आपल्याच आहेत, हा दृष्टीकोन ठेवा, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल !

अनेक सांप्रदायिकांना आपल्या संप्रदायाचा अहंकार असतो. इतर सर्व संप्रदाय तुच्छ आहेत, असे त्यांना वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, विविध संप्रदाय हे भवरोगातून मुक्त व्हायचे, ईश्‍वरप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. रोगापासून मुक्त होण्यासाठी ज्याप्रमाणे निरनिराळी औषधे असतात, त्याप्रमाणे भवरोगातून मुक्त होण्यासाठी निरनिराळे संप्रदाय आहेत. क्षयरोग किंवा दुसरा एखादा विकार झालेल्यांनी मी घेतो, ते औषध सर्वश्रेष्ठ आहे. इतर औषधे उपयोगाची नाहीत, असे म्हणणे जसे हास्यास्पद होईल, तसे इतर संप्रदायांना तुच्छ लेखणे हास्यास्पद होते. यामुळेच निर्माण होणारा अहं साधनेपासून दूर नेतो.

ईश्‍वराला सर्वच संप्रदाय त्याचे वाटतात. संकुचित वृत्तीच्या सांप्रदायिकांना इतर संप्रदायांबद्दल प्रेम वाटू लागले की, अहं कमी होऊन तेही ईश्‍वराजवळ पोहोचतात.

सांप्रदायिकांना जो नियम लागू पडतो, तोच हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही लागू पडतो. त्यांनीही इतर संघटना आपल्याच आहेत, हा दृष्टीकोन ठेवून त्यांच्यासह कार्य करणे आवश्यक आहे. तसे केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment