याचे कारण हे की, तन-मन-धनाच्या त्यागामुळे संतांच्या वाणीत चैतन्य असते, तर कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा कसलाही त्याग नसल्यामुळे, उलट धनाची अपेक्षा ठेवून कीर्तन आणि प्रवचन केल्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. यामुळे त्यांचे बोलणे परिणामकारक नसते. – (प.पू.) (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गीतेवर प्रवचन करणार्यांनो, तिचे महत्त्व सांगणार्यांनो, अर्जुनाच्या एक शतांश असा एक तरी धर्मयोद्धा आयुष्यात तयार केलात, तरच गीता जगलात असे होईल, नाहीतर प्रवचन म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे ठरतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले