संत नको म्हणत असतांना त्यांना आपल्या स्वेच्छेने नमस्कार करणे अयोग्य

मी कोणाकडून नमस्कार करून घेत नाही; कारण मला मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे, याची सतत जाणीव असते. हे सनातनच्या साधकांना ज्ञात आहे; मात्र भेटायला येणारे नको म्हटले, तरी नमस्कार करतात. त्या नमस्कारावरून ते स्वेच्छेने भावनेपोटी नमस्कार करत असल्याचे लक्षात येते; कारण साधनेत असलेला आपल्यापेक्षा साधनेत पुढे असलेल्याचे आज्ञापालन करतो, म्हणजेच परेच्छेने वागतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment