५.१.२०१५ पासून प्रतिदिन पूजा केल्यावर प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांना नमस्कार करतांना माझ्याकडून त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि श्री अनंतानंद साईश यांचे गुरु श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांनाही नमस्कार होऊ लागला. प.पू. रामानंद महाराज यांनी देहत्यागापूर्वी ७ वर्षे माझा मृत्यूयोग टाळणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी अनेक अनुष्ठाने केली होती. श्री अनंतानंद साईश आणि श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांना नमस्कार का होऊ लागला ?, हे मला कळत नव्हते. २९.१२.२०१४ या दिवशी राजस्थानचे संत पू. ओंकारानंद महाराज रामनाथी आश्रमात रहाण्यासाठी आले. त्यांच्याशी जवळीक झाली. ते आमच्या कार्यात सर्वतोपरी सहभागी झाले. ते कार्यात सहभागी कसे झाले, याचा मला आज असा उलगडा झाला की, श्री अनंतानंद साईश आणि श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद राजस्थानचे होते. त्यांनी कार्य वाढण्याच्या दृष्टीने राजस्थानचे संत पू. ओंकारानंद महाराज यांना रामनाथी आश्रमात येण्याची स्फूर्ती दिली. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले