शासन करणारा पक्ष पालटला की, शासकीय समित्यांवरील पराभूत पक्षांच्या पदाधिकार्यांच्या जागी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती केली जाते. या शासकीय समित्यांमध्ये काही सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या विश्वस्त समित्यांचाही समावेश असतो. सत्ताधारी पक्ष पालटतो तसे देवस्थान समित्यांचे पदाधिकारी पालटत असल्यामुळे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी सरकारीकरण झालेल्या मंदिरांचेही राजकारण आरंभले आहे, हे स्पष्ट होते. कोणत्याही देवस्थानाचा कारभार हा राजकारण विरहित असावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेल्या मंदिरांसह सर्वच मंदिरांच्या विश्वस्तपदी भक्तांची नियुक्ती व्हावी, यासाठी भाविकांनी आग्रही रहायला हवे. – (प.पू.) डॉ. आठवले