विरोध करणार्या बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना, पोलीस, सरकार आणि धर्मांध यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक आणि कार्यकर्ते यांना भीती वाटत नाही; कारण श्रीकृष्ण पाठीराखा आहे, अशी त्यांंची श्रद्धा आहे; कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, न मे भक्तः प्रणश्यति । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही.
२००८ या वर्षी सनातनवरील बंदीच्या प्रयत्नांना आरंभ झाला, अनेक स्तरांवर अनेक प्रयत्न झाले, तरी अजूनपर्यंत बंदी आलेली नाही. या अनुभूतीमुळे त्या श्रद्धेला आणखीनच बळकटी आली आहे. – (प.पू.) डॉ. आठवले
स्वार्थी राजकारणी राजकारण करतात, तर निःस्वार्थी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे धर्मकारण करतात ! – (प.पू.) डॉ. आठवले
पांडवांना कौरवांशी, म्हणजे त्यांच्या भावंडांशी लढावे लागले. तसे खर्या हिंदुत्वनिष्ठांना पुढे ढोंगी हिंदुत्वनिष्ठांशी लढावे लागेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले