साधू-संतांनी हिमालयात खडतर तपश्‍चर्या करण्याची कारणे

अनेक साधू-संतांनी हिमालयात खडतर तपश्‍चर्या केल्याचे वाचनात येते. ते वाचून मला वाटायचे, तपश्‍चर्येसाठी एकांत हवा असेल, तर हिमालयात कशाला जायला पाहिजे ? गावाबाहेर जाऊन ते तपश्‍चर्या का करत नाहीत ? याचे पुढील उत्तर लक्षात आले.

१. हिमालय सात्त्विक आहे. त्यामुळे साधनेसाठीचा परिसर शुद्ध करण्यासाठी साधनेचा व्यय होत नाही.

२. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला त्या प्रश्‍नाचे बुद्धीला समजेल असे उत्तर मिळाले. मला हिवाळ्यातही उष्णतेचा त्रास होतो. साधी बंडी अंगात घालायला नको वाटते. मी सतत पंखा चालू ठेवतो. माझी तपश्‍चर्या नाही. मी साधी साधना केली, तरी मला उकडते, तर खडतर तपश्‍चर्या करणार्‍यांना किती उकडत असेल ! या उकाड्यापासून रक्षण होण्यासाठी अनेक साधू-संत हिमालयात खडतर तपश्‍चर्या करत असावेत.
– (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment