राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अतिशय गंभीर असूनही संत त्या संदर्भात काही का करत नाहीत ?, असा प्रश्न काही जणांना पडतो. त्याचे उत्तर येथे दिले आहे.
१. कालमाहात्म्य जाणणे : काही केले नाही, तरी २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, हे ज्ञात असल्याने हल्लीच्या उन्नतांना त्या संदर्भात काही करावेसे वाटत नाही.
२. सर्व माया असल्याचे जाणणे : हे जाणल्यामुळे काही करावे, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही.
३. ब्रह्मानंदी असणे : एखाद्याला एखाद्या कृतीतून आनंद मिळणार असेल, तर तो ती कृती करतो. एखाद्याला आनंद आधीपासूनच असला, तर तो ती कृती कशाला करील ? उन्नत (संत) ब्रह्मानंदात असल्याने त्यांच्या मनात काही करावे, असा विचार येत नाही.
श्रीकृष्णाला वरील सर्व सूत्रे लागू पडत असूनही त्याने सर्वकाही केले. यावरून तो मायेत राहूनही स्वतःची सच्चिदानंद अवस्था न गमावता सर्वकाही करू शकणारा एकमेवाद्वितीय असल्याचे लक्षात आले.
– (प.पू) डॉ. आठवले